IND W vs WI W T20 World Cup : महिला टीम इंडियाने वर्ल्डकप सिरीजमधील पहिला सामना जिंकला आहे. पाकिस्तानला 7 विकेट्सने नमवत टीम इंडियाच्या महिलांनी वर्ल्डकपचा विजयी श्रीगणेशा केला आहे. आज टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजशी सुरु आहे. या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाची ओपनर स्मृति मंधानाचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात बोटाच्या दुखापतीमुळे स्मृतीला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं होतं.


टीम इंडियाचं प्लेईंग 11


स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), देविका वैद्य, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका सिंह ठाकुर


वेस्ट इंडिजचं प्लेईंग 11


हेली मॅथ्यूज (कर्णधार), स्टेफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कोनेल, रशदा विलियम्स (विकेटकीपर), शेकेरा सेलमॅन, करिश्मा रामहॅरेक