मुंबई : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात झालेल्या सामन्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. केन विलियमसनने (Kane Williamson) जोस बटलरची (Jos Buttler) माफी मागितली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, न्यूझीलंडच्या कर्णधाराने असं का केलं असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICC टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये असं पहिल्यांदाच पाहायला मिळालं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) टॉप खेळाडूंमध्ये गणला जातो. तो वाद-विवाद याच्यापासून लांबच राहतो. त्यामुळेच त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात देखील त्याची खेळाडूवृत्ती दिसली. जोस बटलरचा कॅच पकडल्यानंतर रिप्लेमध्ये त्याला नॉटआऊट देण्यात आलं. त्यानंतर त्याने जोल बटलरची माफी मागितली. कारण त्याने कॅच पकडला तेव्हा त्याला वाटलं की, त्याने योग्य कॅच पकडला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


इंग्लंडच्या इनिंग दरम्यान सहाव्या ओव्हरमध्ये हे सर्व घडलं. त्यावेळी बटलर 8 बॉलमध्ये 8 रनवर खेळत होतो. मिचेल सँटनर गोलंदाजी करत होता. कर्णधार केन विलियमसनने शानदार कॅच पकडला पण तो नॉट आऊट होता. थर्ड अंपायरने (Third Umpire) बटलरला नॉटआऊट दिलं. विलियमसनने कॅच पकडल्याचा दावा केला. पण नंतर त्याने बटलरची माफी मागितली. आयसीसीने शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.