SA vs IND : सूर्यकुमार बाद होताच Tabraiz Shamsi चं खास सेलिब्रेशन; बुट काढून कोणाला लावला फोन?
India vs South Africa 2nd T20I : टीम इंडियाला टेन्शन दिलं ते साऊथ अफ्रिकेचा लेग स्पिनर तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) याने.. सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) महत्त्वाची विकेट घेऊन त्याने साऊथ अफ्रिकेला सामन्यात खेचून आणलं होतं.
Tabraiz Shamsi shoe celebration : दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात (SA vs IND 2nd T20I) सेंट जॉर्ज पार्कमध्ये दुसरा टी-20 सामना खेळवण्यात येत आहे. पहिला सामना पावसाने धुतला गेल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुसरा सामना भारताचे तीन बॉल बाकी असतानाच थांबवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या नव्या छाव्यांनी धुंवाधार फलंदाजी करत 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या आहेत. कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रिंकू सिंह यांनी तडाखेदार फलंदाजी करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. या सामन्यात टीम इंडियाला टेन्शन दिलं ते साऊथ अफ्रिकेचा लेग स्पिनर तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) याने.. सूर्यकुमार यादवची महत्त्वाची विकेट घेऊन त्याने साऊथ अफ्रिकेला सामन्यात खेचून आणलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल दोघंही शुन्यावर बाद झाले. तर तिलक वर्मा 29 धावा करत बाद झाला. आता टीम इंडिया संकटात सापडली होती. त्यावेळी सूर्याने आणि रिंकूने (Rinku Singh) आक्रमण करत साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढलं. दोघांनी डाव 100 पार केला. चौदाव्या ओव्हरमध्ये मात्र, टीम इंडिया धक्का बसला.
चौदाव्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने विकेट गमावली. मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्याने आपली विकेट गमावली. त्यावेळी शम्सीच्या बॉलने कमाल केली अन् बॉल थेट फिल्डरच्या हातात गेला. सूर्याची मोठी विकेट भेटल्यावर शम्सीने जंगी सेलिब्रेशन केलं. त्याने पायातला बुट हातात घेतला अन् फोन लावत सिग्नेचर सेलिब्रेशन केलं.
IND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका : एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.