मुंबई: तौत्के चक्रीवादळाचा तळ कोकणासह मुंबईला देखील मोठा तडाखा बसला आहे. निसर्ग चक्रीवादळापेक्षाही यंदा आलेल्या तौत्के चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईतच जवळपास 500 हून अधिक झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये घरांचे पत्रे देखील उडून गेले आहेत. या चक्रीवादळात मुंबईतील वानखेडे स्टेडियम देखील सापडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडे स्टेडियममध्ये देखील चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. तौत्के चक्रीवादळाचा सोमवारी 185 प्रति किलोमीटर वेग होता. हे वादळ संध्याकाळी गुजरातच्या सौराष्ट्र भागात धडकलं आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे वादळी-वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. 




या वादळाच्या तडख्यात वानखेडे स्टेडियम देखील आलं होतं. स्टेडिममधील स्टॅण्ड, साइड स्क्रीनची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टेडियममध्ये मोठं नुकसान झालं आहे.


वानखेडे स्टेडियममध्ये चक्रीवादळ तौत्केमुळे झालेल्या विध्वंसाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. वानखेडे स्टेडियमची अशी अवस्था पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. ट्विटरवर वानखेडे स्टेडियमचे फोटो शेअर करुन लोक सतत कमेंट करत असतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात चक्रीवादळ वादळाचे मोठे परिणाम दिसून आले आहेत. या चक्रीवादळामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.