कोलकाता : टीम इंडिया कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खूपच अडचणीत आलेली दिसत आहे. तीन कसोटींच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवशी संपूर्ण भारतीय संघ 172 धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवशी संघाने 5 बाद 74 रनवर सामन्याची सुरुवात केली आणि संघ 59.3 षटकात 172 धावावरच ऑल आऊट झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतकडून चेतेश्वर पुजाराने 52 धावा, रिद्धिमान साहा याने 29 धावा केल्या. रवींद्र जडेजा 22, भुवनेश्वर कुमार 13, मो. शमी 24 धावांवर बाद झाला. उमेश यादव 6 धावांवर नाबाद राहिला, के एल राहुल 0 तर, शिखर धवन 8, विराट कोहली 0, रहाणे 4 आणि रविचंद्रन अश्विन 4 धावांवर आऊट झाला.


सुरंगा लकमलने श्रीलंकेसाठी सर्वाधिक 4 विकेट घेतले. लाहिरू गमाने, दासुन शनाका आणि दिलरुवान परेरा यांनी प्रत्येक 2 विकेट घेतल्या. सामन्यात टीम इंडिया सध्या सध्या खूप कठीण परिस्थितीत आहे. या सीरीजसाठी टीम इंडियाला सर्वात मोठा विजयाचा स्पर्धक मानला जातो आहे.


टीम इंडियाने यावर्षी जुलै ते ऑगस्टमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. हा विक्रम भारतीय संघाच्या बाजूने आहे. भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेविरोधात एकही कसोटी सामना गमावला नाही आहे. यापूर्वीही भारताने श्रीलंकेविरूद्ध परदेशात विजय मिळवला आहे.