मुंबई : देशाचे क्रिकेटबोर्ड बीसीसीआय़ खुप श्रीमंत आहे. भारताचं हे क्रिकेटबोर्ड खेळाडूंवर बक्कळ पैसा खर्च करते. मग ती त्यांची सॅलरी असो अथवा क्रिकेच किट. तसेच सामन्यातील विशेष कामगिरीनंतर देखील या खेळाडूंना खुप मोठी रक्कम मिळते. या रक्कमेमुळेच हे खेळाडू करोडपती बनत असतात. त्यामुळे जाणून घेऊयात टीम इंडियाचा कोणता खेळाडू सर्वांत जास्त संपत्तीचा मालक आहे तो. 
 
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा जगातील स्टार अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. त्यामुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. तसेच टीम इंडियाचा तो प्रमुख खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई संघाकडून मोठी रक्कम घेऊन दरवर्षी खेळतो. क्रिकेटच्या सर्वंच फॉरमॅटमध्ये तो खेळत असल्याने त्याचे उत्पन्न देखील चांगले आहे. याच उत्पनामुळे तो राजेशाही जीवन जगतो. दरम्यान त्यांची एकूण संपत्ती आणि लाईफस्टाईल बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालपण
रवींद्र जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी जामनगरमध्ये झाला. त्याचे बालपण खूप अडचणींमध्ये गेले. जडेजाचे वडील जामनगरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे आणि आई हॉस्पिटलमध्ये परिचारिका होती.


एकूण संपत्ती किती? 
मीडिया रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती 13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 100 कोटी रुपये) आहे. जडेजाच्या उत्पन्नाचा आणि निव्वळ संपत्तीचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याला चेन्नई संघाने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.


आलिशान बंगला आणि फार्महाऊस
रवींद्र जडेजाचं घर गुजरातमधील जामनगरमध्ये आहे. त्यांचा बंगला राजवाड्यापेक्षा कमी नाही. या 4 मजली बंगल्यात मोठे दरवाजे आणि विंटेज फर्निचर आणि झुंबर आहेत. रवींद्र जडेजा अनेकदा आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. रवींद्र जडेजाचेही एक फार्म हाऊस आहे, त्याचे नाव 'मि. जड्डू फार्म हाऊस आहे.  


कारकिर्द 
रवींद्र जडेजाची आतापर्यंतची कारकीर्द चांगलीच राहिली आहे. 171 एकदिवसीय सामन्यांमध्ये जडेजाने 13 अर्धशतकांसह 2447 धावा केल्या आणि त्याच्या नावावर 189 विकेटही आहेत. 60 कसोटीत 2523 धावा करत 242 विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजाने टी-20 मध्ये 62 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये जडेजाने 422 धावा केल्या असून 50 विकेट घेतल्या आहेत.


दरम्यान आशिया कपसाठी रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. या संधीचा तो फायदा घेऊन कशी कामिगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.