Team India squad for T20 World Cup 2024 : आयपीएल हंगाम सुरू असतानाच टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या टीमचा उप-कर्णधार राहील. विशेष म्हणजे, वर्ल्ड कपच्या संघातून केएल राहुलला दूर ठेवण्यात आले. तर युजवेंद्र चहल आणि ऋषभ पंत यांची संघात एंट्री होत आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी एकूण 19 खेळाडूंच्या नावाचा विचार करण्यात आला होता. त्यातील 15 खेळाडू वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होतील. तर 4 खेळाडूंना रिझर्व म्हणून निवडण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी आहे टीम इंडिया?


तब्बल 14 महिन्यानंतर ऋषभ पंतचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. तर आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला देखील 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालंय. त्याचबरोबर रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल उतरणार आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव याशिवाय शिवम दुबेला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. या तीन खेळाडूंवर मिडल ऑर्डरची जबाबदारी राहिल. तर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या स्टार ऑलराऊंडरवर टीम इंडियाची भिस्त असणार आहे. 


गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची जबाबदारी असेल तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज या तीन फास्टर गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. एवढंच नाही तर शुभमन गिल, खलिल अहमद, आवेश खान, रिंकू सिंग या चार खेळाडूंना रिझर्व म्हणून ठेवण्यात आलं आहे.



टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.


रिझर्व खेळाडू - शुभमन गिल, खलिल अहमद, आवेश खान, रिंकू सिंग.


टीम इंडियाचं वेळापत्रक - 


5 जून,  बुधवार  - भारत विरुद्ध आयरलँड, न्यूयॉर्क.
9 जून, रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क.
12 जून, बुधवार - यूएसए विरुद्ध भारत, न्यूयॉर्क.
15 जून, शनिवार - भारत विरुद्ध कनाडा, फ्लोरिडा.