सिडनी : यावर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ टेस्ट मॅच खेळेल. या टेस्ट मॅचपैकी पहिली टेस्ट ऍडलेडमध्ये ६ डिसेंबर ते १० डिसेंबरमध्ये खेळवण्यात येईल. पण ही टेस्ट मॅच डे अॅण्ड नाईट असावी यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आग्रही आहे. डे अॅण्ड नाईट टेस्टसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यासाठी बीसीसीआयशी चर्चा करत आहेत. भारत आत्तापर्यंत एकही डे अॅण्ड नाईट टेस्ट मॅच खेळलेला नाही. पुढच्या काही आठवड्यांमध्ये बीसीसीआय याचं उत्तर देईल, असं सदरलँड म्हणाले.


भारत खेळला नाही अशी मॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत भारत एकदाही डे अॅण्ड नाईट टेस्ट मॅच खेळलेला नाही. यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध भारत अशी टेस्ट मॅच खेळेल अशा चर्चा सुरु होत्या.


ऍडलेडमध्ये झाल्या ४ टेस्ट


ऍडलेडच्या मैदानामध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी डे अॅण्ड नाईट टेस्ट मॅच खेळल्या आहेत. भारतानंही यावर्षी अशी टेस्ट मॅच खेळावी, अशी इच्छा क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आहे.


असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा


भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी-20 सीरिजपासून होणार आहे. २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ३ टी-20 मॅच खेळवण्यात येणार आहेत. यानंतर चार टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. ऍडलेड (६-१० डिसेंबर), पर्थ(१४-१८ डिसेंबर), मेलबर्न(२६-३०डिसेंबर) आणि सिडनी(३-७जानेवारी)मध्ये या टेस्ट मॅच खेळवण्यात येतील. टेस्ट सीरिजनंतर १२ ते १८ जानेवारीदरम्यान ३ वनडे मॅचची सीरिज खेळली जाईल.