Ind vs NZ : `Gill`done टीम इंडिया! वनडे पाठोपाठ टी-20 मध्येही भारताने किवींना चारली धूळ
या सामन्यामध्ये टीम इंडियाचा (Team India Beat new zealand) विजय झाला आणि भारताने सिरीजवर देखील कब्जा केला.
Ind vs NZ : भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात आज शेवटची आणि निर्णायक टी-20 खेळवली गेली. अखेर या सामन्यामध्ये टीम इंडियाचा (Team India Beat new zealand) विजय झाला आणि भारताने सिरीजवर देखील कब्जा केला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये 2-1 असा विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने किंवींचा 168 रन्सने पराभव केला आहे. अवघ्या 66 रन्सवर न्यूझीलंडच्या टीमला ऑलआऊट करण्यात यश आलं आहे. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय मानला जातोय.
न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली
न्यूझीलंडची फलंदाजांचा फ्लॉप शो आज पहायला मिळाला. टीम इंडियाने दिलेल्या 235 रन्सच्या आव्हानासमोर किवी पूर्णपणे ढेपाळले. न्यूझीलंडकडून Daryl Mitchell आणि मिचेल सँटरनला केवळ दुहेरी धावसंख्या गाठता आली. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर किवींच्या फलंदाजांनी गुढघे टेकले.
भारतीय गोलंदाजांची उत्तम कामगिरी
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे. ऑलराऊंडर आणि टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने 4 विकेट्स पटकावल्या आहेत. तर अर्शदीप सिंग, शिवम मावी आणि उमरान मलिकला प्रत्येकी 2-2 विकेट्स काढण्यात यश आलं आहे. गोलंदाजांनी अवघ्या 12.1 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला.
शुभमन गिलचं तुफानी शतक
भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या टी-20 सामन्यामध्ये भारताचा सलामीवर शुभमन गीलने (Shubman Gill) षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला आहे. शुभमनने दमदार फलंदाजी करताना अवघ्या 54 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. शुभमन आणि कर्णधार हार्दिक पंड्याच्या जोडीने 42 चेंडूंमध्ये 103 धावांची भागीदारी केली. शुभमनचं हे टी-20 मधील पहिलं शतक असून यापूर्वी त्याचा या फॉरमॅटमधील सर्वोच्च स्कोअर 46 इतका होता.
टीम इंडियाचा सिरीजवर कब्जा
भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 235 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. भारताने टी-20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तीन सामन्यांची ही सिरीज सध्या 1-1 ने बरोबरीत होती. या मालिकेतील पाहिला सामना न्यूझीलंडने जिंकला तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला होता. अखेर आजचा तिसरा सामना टीम इंडियाने जिंकला असून सिरीजही खिशात घातली आहे.