Team India : एकदिवसीय वर्ल्ड कपची (ODI World Cup 2023) उतुकतेने वाट पाहाणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Fans) आनंदी बातमी आहे. रायपूर वन डेत (Raipur One Day) टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 विकेटने धुव्वा उडवला (India Beat New Zealand). या विजयाबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली. आता 24 जानेवारीला भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच अभेद्य किल्ला
गेल्या काही सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर टीम इंडियाचा घरात पराभव करणं कोणत्याही संघाला शक्य झालेलं नाही. विशेषत: द्विपक्षीय मालिकेत भारताचा रेकॉर्ड मजबूत होत चालला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या मालिकेत टीम इंडियाने सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यापैकी जवळपास सर्वच मालिकांमध्ये भारताने विरोधी संघांवर वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे भारताला भारतात हरवणं तितकंच सोप नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.  


गेल्या दहा एकदिवसीय मालिका (भारतात खेळवण्यात आलेल्या मालिका)


1.    न्यूजीलंड- टीम इंडिया 2-0 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2023
2.    श्रीलंका- टीम इंडिया 3-0 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2023
3.    दक्षिण आफ्रीका- टीम इंडिया 2-1 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2022
4.    वेस्टइंडीज - टीम इंडिया 3-0 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2022
5.    इंग्लंड- टीम इंडिया 2-1 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2021
6.    ऑस्ट्रेलिया- टीम इंडिया 2-1 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2020
7.    वेस्टइंडीज- भारत 2-1 ने विजयी (3 सामन्यांची मालिका) 2020
8.    ऑस्ट्रेलिया- भारत 2-3 ने पराभूत (5 सामन्यांची मालिका) 2019
9.    वेस्टइंडीज- भारत 3-1 ने विजयी (5 सामन्यांची मालिका) 2019
10.   श्रीलंका- भारत 2-1 ने विजीय (3 सामन्यांची मालिका) 2018 


बलाढ्य न्यूझीलंडला चारली धुळ
आयसीसीच्या एकदिवीस क्रमवारीत न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे, तर भारतीय क्रिकेट संघ चौथ्या स्थानावर आहे. पण या मालिकेत भारतीय संघाचंचं वर्चस्व दिसून आलं. पहिल्या एकदिवसीय सामन्या शुभमन गिलने दुहेरी शतक करत न्यूझीलंडसमोर विजयाचं बलाढ्य आव्हान ठेवलं . तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली.


रायपूर एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने तब्बल 8 विकेटने विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडचा संघ अवघ्या 108 धावांवर ऑलाआऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट घेतल्या. गोलंदांजांनी कमाल केल्यानंतर फलंदाजीतही भारतीय संघ अव्वल ठरला. कर्णधार रोहित शर्माने 51 धावांची विजयी खेळी केली. तर शुभमन गिल 40 धावांवर नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिलं.


भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत 115 एकदिवसीय सामने खेळले गेले असून यात 57 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर 50 सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा पराबव केला आहे. एक सामान्याचा निकाल लागला नाही.