हैदराबाद : हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी२० मध्ये टीम इंडियाने वेस्टइंडीजचा ६ विकेटने पराभव केला आहे. ३ सामन्यांच्य़ा सिरीजमध्ये भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. केएल राहुल आणि विराट कोहली यांनी चांगली खेळी करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. भारतापुढे वेस्टइंडीजने २०८ रनचं आव्हान ठेवलं होतं. याआधी भारतीय संघाने श्रीलंकेच्या विरोधात २००९ मध्ये २०७ रनचं आव्हान पूर्ण केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टइंडीजने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमवत २०७ रन केले होते. टीम इंडियाने १८.४ ओव्हरमध्येच २०९ रन करत पहिला सामना आपल्या नावे केला. विराट कोहलीने ५० बॉलमध्ये ९५ रन तर लोकेश राहुलने ६२ रनची खेळी केली. वेस्टइंडीजच्या विरोधात भारताने हा लागोपाठ सातवा विजय मिळवला आहे.



रोहित शर्मा ८ रनवर आऊट झाल्याने भारताला पहिला झटका लागला. त्यानंतर केएल. राहुलने कोहलीसोबत १०० रनची पार्टनरशिप केली. लोकेश राहुल ६२ रनवर आऊट झाला.


वेस्टइंडीजच्या टीमकडून शिमरोन हेटमेयर याने ५६, पोलार्डने ३७ तर इविन लुईसने ४० रन केले. इविन लुईसने १७ बॉलमध्ये ४० रन केले. ब्रेंडन किंगने ३१ रन केले.