मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वात उत्तम फलंदाज आहे. त्याचे फॅन फॉलोअर्स देखील जगभरात आहेत. त्यांचं प्रेम जसं कोहलीला बळ मिळतं तसंच कधी कधी या फॅन्समुळे अनेक संकटांमध्ये सामना करावा लागत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका फॅनमुळे विराट कोहलीला खूप जास्त भीती वाटली. त्याच्या वागण्यानं कोहली घाबरला आणि त्याने सिक्युरिटी गार्डला देखील बोलवलं. नेमकं असं काय घडलं होतं कोहली सोबत जाणून घेऊया.


IPLचा सामना संपल्यानंतर विराट कोहली दुबईमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेले होते. तिथल्या मॉलमध्ये कोहली आणि त्याचे टीममेंबर्स येणार म्हणून आधीच सिक्युरिटी आणि तिथली गर्दी कमी केली होती. तर सर्वसामान्य लोकांना या मॉलमध्ये एन्ट्री बंद केली होती. 


इंग्रजी शिकता शिकता भज्जी पडला प्रेमात, पत्नीसमोर सांगितला गर्लफ्रेंडचा किस्सा


विराटने एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'दुबईतल्या मॉलमध्ये ठरल्याप्रमाणे आमची पार्टी सुरू झाली. त्याच दरम्यान खूप गदारोळ सुरू झाला. नेमकं काय झालं हे बघायला मी बाहेर आलो. तेव्हा मॉल बाहेर खूप गर्दी होती.' 


'अफगाणिस्तानचा एका व्यक्ती होता. त्याचे लांब केस होते त्याचा अवतार पाहून दोन मिनिटं कुणालाही भीती वाटावी असाच होता. त्याला रेस्टॉरंटमधून बाहेर काढलं म्हणून तो खूप नाराज होता. त्याने मला पाहिल्यानंतर फोटो काढण्याचा आग्रह करू लागला.'


'जमलेली गर्दी पाहून मी त्याला म्हटलं आता इथे ते शक्य नाही. तर त्याने माझा जबरदस्ती हात पकडून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून मला खूप भीती वाटली मी तातडीनं सिक्युरिटी गार्डला याची माहिती दिली.'


मी घरादार सोडून आलेय...' शांत, संयमी द्रविडला जेव्हा एका तरुणी फॅनने आणलं अडचणीत


याआधी राहुल द्रविडला देखील एका फॅनमुळे त्रास सहन करावा लागला होता. तरुणी त्याच्यासाठी स्वत:चं घर सोडून त्याच्या घरी आली होती. या प्रकरणात तर पोलिसांनी मध्यस्ती करावी लागली होती. त्यांनी फॅन तरुणीला सुखरुप घरी सोडलं. पण त्यामुळे राहुल द्रविडला अडचणींचा सामना करावा लागला होता.