मी घरादार सोडून आलेय...' शांत, संयमी द्रविडला जेव्हा एका तरुणी फॅनने आणलं अडचणीत

राहुल द्रविड अत्यंत शांत आणि धौर्यवान फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका फॅननं केला नेमकं काय घडलं?

Updated: May 21, 2021, 04:16 PM IST
मी घरादार सोडून आलेय...'   शांत, संयमी द्रविडला जेव्हा एका तरुणी फॅनने आणलं अडचणीत title=

मुंबई: क्रिकेटचे जाहते भारतातच नाही तर जगभरात आहेत. पण भारतात हा खेळ किंवा त्यांच्याकडे फक्त खेळाडू म्हणून नाही तर देवासमान वागणूक क्रिकेटपटूंना दिली जाते. खेळाडूंची पूजा केली जाते तर कुठे त्यांचे बोर्ड लावून त्यांचं अभिनंद केलं जातं. भारतातील चाहते खेळाडूंसाठी अगदी वेडे असतात. अशाच एका चाहत्यामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड मोठ्या संकटात सापडला होता. 

राहुल द्रविड हा धौर्यवान आणि शांत स्वभावासाठी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे चाहतेही खूप आहेत. त्याने एका तरुणीमुळे झालेला अजब किस्सा आणि त्यामुळे ओढवलेला प्रसंग 'व्हॉट द डक' या मुलाखतीदरम्यान शेअर केला आहे. 

'टीम इंडियाचा माजी कर्णधार वीयू याने सांगितलं की, मी कोणत्यातरी लांब दौऱ्यावरून भारतात परतलो होतो. खूप थकल्यानं दुपारी घरी येऊन झोपलो. संध्याकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या घरच्यांनी सांगितलं की तुला भेटायला एक तरुणी आली आहे. त्यावर राहुल द्रविडला वाटलं की एक फोटो आणि ऑटोग्राफ हवी असेल. जनरली प्रत्येक फॅन हा ऑटोग्राफ किंवा फोटो घेऊन जातो.' 

धक्कादायक! टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूला झोपेत चालायची सवय....पहाटे २ वाजता बॅटिंगचा सराव करायचा

'आईनं त्या तरुणीला घरात घेतलं. हैदराबादवरून ती आल्यानं तिची विचारपूस केली. त्यानंतर तिला चहा कॉफी दिली. मी तिला भेटलो ऑटोग्राफ दिली आणि फोटोही मात्र ती हट्ट धरून बसली. आपल्या घरी पुन्हा जाण्यासाठी तयार नव्हती.' 

'आम्ही सगळ्यांनी तिला समजवलं. मात्र तिने हेका धरला की मी सगळं घरदार आई-वडील सोडून आले आहे. आता मी इथेच राहणार आहे. मी इथून जाणार नाही. अखेर या प्रकरणात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. सर्वांनी तिला समजवलं अखेर पोलिसांच्या स्वाधिन करून त्यांनी तिला घरी पोहोचवलं.' 

सचिन तेंडुलकरची खोडकर वृत्ती! या क्रिकेटपटूच्या रूममध्ये भरलं पाणी

'हा अनुभव आम्हाला खूप काही शिकवणारा होता. विशेषत: घरात प्रत्येकाला येऊ द्यायचं नाही हा अनुभव त्या दिवशी मिळाला. फॅन फॉलोअर्स असणं प्रत्येकालाच चांगलं वाटतं पण त्यांच्यामुळे काहीवेळा अडचणीही निर्माण होतात', असंही राहुल द्रविडने सांगितलं आहे.