Team India Coach: मोठी बातमी! टीम इंडियाच्या हेड कोचचा अखेर राजीनामा
टीम इंडियाच्या कोचने राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढील तीन महिने त्यांना नोटीस पीरियड द्यावा लागणार आहे.
Team India Coach: ओडिशामध्ये खेळवण्यात आलेला पुरुष हॉकी वर्ल्डकपमध्ये ( Hockey World cup ) टीम इंडियाची कामगिरी खास राहिली नाही. या वर्ल्डकपमध्ये ( World cup ) टीम इंडियाला ( Team India ) क्वार्टरफायनलमध्येही स्थान मिळवता आलं नाही. दरम्यान टीमच्या या खराब कमागिरीनंतर हेड कोच ग्राहम रीड ( Graham Reid ) यांनी राजीनामा दिला आहे. रीडसह विश्लेषण कोच ग्रेग क्लार्क आणि वैज्ञानिक सलाहकार मिशेल डेविड पेम्बरटन यांनीही त्यागपत्र दिलं आहे.
58 वर्षीय रीड यांनी भुवनेश्वरमध्ये हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर ग्राहम रीड यांना सांगितलं की, आता वेळ आली आहे की, मी बाजूला व्हावं आणि दुसऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवावी. भारतीय टीम आणि हॉकी इंडिया यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी यावेळी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. मी या टीमना खूप शुभेच्छा देतो.
रीड यांच्या कोचिंगमध्ये भारताने केली चांगली कामगिरी
राजीनामा दिल्यानंतर पुढील तीन महिने त्यांना नोटीस पीरियड द्यावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून हॉकी खेळलेले रीड आणि त्यांची टीमसोबत भारताने 41 वर्षांनंतर ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. या शिवाय टीम इंडियाने बर्मिंघम राष्ट्रमंडळांच्या खेळांमध्ये रजत आणि एफआयएच प्रो लीग 2021-22 च्या सत्रामध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं. रीड कोच असताना भारतीय टीमने 2019 मध्ये एफआयएच विश्व सिरीज फायनल्स जिंकली होती.
रीडसोबत तिघांचेही राजीनामे स्वीकारत हॉकी इंडियाचे अध्यक्ष टिर्की म्हणाले, टीम इंडियाला उत्तम रिझल्ट देणाऱ्या ग्रॅहम रीड आणि त्यांच्या टीमचे भारत नेहमीच ऋणी राहणार आहे. खासकरून ऑलिम्पिक खेळांमध्ये. प्रत्येक प्रवासामध्ये नवे टप्पे येणार आहे आणि आता टीमसाठी नव्या विचाराने पुढे जावं लागणार आहे.
सध्या नवव्या क्रमांकावर टीम इंडिया
भारत हॉकी वर्ल्डकपमध्ये 2023 मध्ये नवव्या स्थानावर आहे. क्रॉसओवर सामन्यामध्ये टीम इंडियाला 12 व्या रँकींगच्या टीम न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. या महत्त्वपूर्ण सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही टीम 3-3 असा बरोबरीमध्ये सुटला. त्यामुळे विजयी टीम ठरवण्यासाठी सामना शूटआऊटमध्ये गेला. शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 ने विजय मिळवला.