मुंबई : हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma)  टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन. रोहितने क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये इतर फलंदाजांना न जमलेला कारनामा रोहितने तब्बल 3 वेळा केला आहे. हिटमॅनने 3 वेळा द्विशतक झळकावलं आहे. रोहित 2013 पासून धमाकेदार कामगिरी करतोय. त्याने अनेकदा टीम इंडियाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. मात्र त्याआधी रोहितला  वैयक्तिक आयुष्यात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला होता. रोहित मॉडेल एक्ट्रेस सोफिया हयातसोबत (Sofia Hayat) रिलेशनमध्ये असल्याची चर्चा  होती. यामुळे रोहितला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफियाने रोहितबाबत अनेकदा उलटसुलट विधानं केली होती. यामुळे रोहित तेव्हा नको त्या कारणांमुळे चर्चेत होता. सोफियाने ट्विट करत म्हटलं होतं की, "रोहितने मला ऑक्टोबर 2012 मध्ये डेट केलं होतं."  मात्र दुसऱ्या बाजूला रोहितने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. 


पहिली भेट कुठे आणि कशी झाली? 


"मी आणि रोहित पहिल्यांदा लंडनमधील एका क्लबमध्ये भेटलो. मी एका सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या आनंदात तिथे सेलिब्रेशन करत होते. मी डान्स करत होते. तेव्हा माझ्या एका मित्राने रोहितसोबत ओळख करुन दिली. मी तेव्हा क्रिकेट पाहत नसल्याने मला रोहितबाबत माहिती नव्हती. मात्र यानंतरही आम्ही दोघं एकमेकांसोबत गप्पा मारत होतो. त्यानंतर आम्ही दोघे एकाबाजूला गेलो. रोहितने मला किस केलं. तसेच त्याने माझ्यासोबत डान्स केला", सोफियाने अशी माहिती  स्पॉटबॉय या वेबसाईटला दिली.


"चाहत्यांचं बोलणं रोहित मनावर घ्यायचा "


"रोहित चांगला आणि प्रेमळ होता.  एकमेकांना भेटावं, असं आम्हा दोघांना वाटायचं. क्रिकेटमधील कामगिरीवरुन आमच्यात चर्चा व्हायची. चांगली कामगिरी न केल्यास चाहते कसे व्यक्त होतात, यावर आम्ही बोलायचो. रोहित चाहत्यांच्या प्रतिक्रियेबाबतीत फार संवेदनशील होता. आम्ही अनेकदा हॉटेलमध्ये सोबत असायचो. त्यामुळे मीडियाला आमच्या दोघांबद्दल माहिती झाली. दोघांबाबतीत कोणीतरी मीडियाला माहिती दिली. याबाबत मी संबंधित हॉटेलच्या मॅनेजरकडे चौकशी केली होती", असंही सोफियाने  नमूद केलं. 


रोहितच्या एका चूकीमुळे ब्रेकअप 


"आम्ही दोघे रिलेशमध्ये नाहीत. रोहितच्या या विधानानंतर मी ब्रेकअप केलं. रोहितने मीडियासमोर माझा चाहती म्हणून ओळख करुन दिली. यामुळे माझ्या भावना दुखावल्या. यानंतर मी रोहितला ट्विटरवर ब्लॉक केलं होतं" असंही सोफियाने स्पष्ट केलं. 


रोहितकडून सर्वप्रकारावर मौन 


रोहितने या सर्व प्रकारावर मौन बाळगलं. रोहितने इतकं सर्व महाभारत झाल्यानंतरही त्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही.  यानंतर दोघांमध्ये फूट पडली. त्यानंतर रोहितने 2015 मध्ये रितीका सजदेहसोबत लगीनगाठ बांधली. तर सोफियाने मॉडेल व्लाड स्टेन्सकूसोबत सप्तपदी घेतल्या.