IND vs ENG : टीम इंडियासमोर इंग्लंडचं लोटांगण! `टॉप` क्लास गोलंदाजीमुळे 100 धावांनी दणदणीत विजय
Team India On Top of points Table : टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली होता. त्यामुळे आज गोलंदाजांची खरी परीक्षा होती. त्याच टीम इंडियाचे गोलंदाज पास झाल्याचं पहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर (India vs England) टीम इंडिया पाईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी विराजमान झालीये.
India vs England, World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 230 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद झाले अन् टीम इंडियाने 20 वर्षानंतर इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पराभव केला आहे. धारदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील 6 वा विजय नोंदवला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. टीम इंडियाकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 87 धावा केल्या. तर मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 7 ओव्हरमध्ये 4 महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या आहेत. तर बुमराहने (Jasprit Bumrah) 3 विकेट घेत इंग्लंडची कंबर मोडली.
टीम इंडियाचने दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला. बुमराहने डेव्हिड मलानचा बोल्ड काढला. त्यानंतर बुमराहने जो रुटला पहिल्याच बॉलवर तंबूत पाठवलं. त्यानंतर शमीने इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले. शमीने बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांना घरचा रस्ता दाखवला अन् भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. इंग्लंडला विकेट्सची गळती लागल्यानंतर बटलरने काहीसा ब्रेक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला अपयश आलं, कुलदीप यादवने बटलरची विकेट काढली. मैदानात सेट होण्याचा प्रयत्न करत असलेल्या मोईन अलीला शमीने तंबूत पाठवलं. त्यानंतर कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करत एकमात्र अडचण दूर केली. त्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही अन् टीम इंडियाला मोठा विजय मिळाला.
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाची रनमशिन चालली नाही. त्यामुळे भारतीय संघाला केवळ 229 धावा करता आल्या आहेत. भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने 101 बॉलमध्ये 87 धावांची झुंजार खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 49 धावांची खेळी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी चांगली सुरूवात मिळून देखील केएल राहुलला मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस बुमराहने टीम इंडियाला फिनिशिंग टच दिला अन् टीम इंडियाचा स्कोर 290 धावांवर पोहोचवला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर क्रिस वोक्स आणि आदिल रशिद यांनी 2-2 गडी बाद केले.
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर (C), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.