Ajinkya rahane: सध्या देशांतर्गत रणजी ट्रॉफी खेळवली जातेय. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने द्विशतक झळकावून पुन्हा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये उप कर्णधारपदाची धुरा सोपवलेल्या अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर ठेवण्यात आलं. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंना येत्या 25 जानेवारीपासून होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्येही स्थान देण्यात आलेलं नाही. अशातच या दोघांसाठीही टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचं माजी खेळाडू आकाश चोपडाने म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याविषयी बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला की, या दोन्ही खेळाडूंचा भविष्यात विचार केला जाणार नाही. या खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत. 


यावेळी आकाशने पुजाराच्या निस्वार्थ वर्तनाचंही कौतुक केलं. आकाश चोप्राने त्याला 'क्रिकेटमधील संत' असं संबोधलं आहे. तो म्हणाला, चेतेश्वर पुजारा कितीही रन करेल, परंतु क्रिकेटपटू राष्ट्रीय टीममध्ये कमबॅक पुनरागमन करू शकेल यावर त्याचा विश्वास नाही. तो उत्तम आणि मजा घेत खेळतोय.


त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नसतील अशी आम्हाला अपेक्षा होती. मला वाटतं त्यांचा चॅप्टर आता क्लोज झाला आहे. जर तुम्ही त्याला दक्षिण आफ्रिकेत निवडले नाही, तर त्याला निवडण्याची ती तुमची शेवटची संधी होती."


पुजाराने गेल्या आठवड्यात द्विशतक झळकावलं होतं. पुजारा रन करत राहील कारण तो फक्त सिलेक्शनसाठी खेळतोय असं नाही. फलंदाजीची आवड असल्यानेच तो क्रिकेट खेळतो. त्याला धावा करायला आवडतात म्हणून तो धावा करतो. त्यामुळे पुजारा धावा करत राहील आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडेल. त्याने आतापर्यंत 61 प्रथम श्रेणी शतके झळकावली आहेत. यावेळी तो 100 चा आकडा गाठेल तो थांबणार नाही. तो अजिबात निवृत्त होणार नाही, असंही आकाश चोप्राने म्हटलंय.


रहाणे-पुजाराच्या यांना इंग्लंडविरूद्ध वगळलं


दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाच्या फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही. यावेळी चाहत्यांनी तसंच अनेक क्रिकेटच्या दिग्गजांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संधी द्यायला हवी होती असं सल्ला दिला होता. यानंतर इंग्लंडविरूद्धच्या टीममध्ये या दोन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पुजारा आणि रहाणे या दोघांच्याही नावाचा विचार करण्यात आलेला नाही. अशातच आता या दोघांना पुन्हा कधी टीम इंडियामध्ये संधी मिळणार हे पहावं लागणार आहे.