मुंबई : टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज एस श्रींसथने (S Sreesanth Retirement) मोठा निर्णय घेतला आहे. श्रीसंथने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीसंथने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. येणाऱ्या नवख्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं श्रीसंथने ट्विटमध्ये म्हटलंय. (team india faster bowler s sreesanth announced her first class cricket retirement for  next generation of cricketers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटमध्ये काय म्हटलंय? 


"हा निर्णय मी पुढच्या पिढीसाठी घेतोय. पुढच्या पिढीतील क्रिकेटपटूंसाठी मी माझी कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा फक्त माझा निर्णय आहे. या निर्णयामुळे मी आनंदी नाही, हे मला माहित आहे. मात्र माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर हा योग्य आणि सन्माननीय निर्णय आहे. मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला", असं श्रीसंथने ट्विटमध्ये म्हटलंय.



श्रीसंथची क्रिकेट कारकिर्द


श्रीसंथने 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी 20 सामन्यात अनुक्रमे 87, 75 आणि 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच आयपीएलमध्ये 44 मॅचेसमध्ये 40 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.


2 वर्ल्ड कप विजय


टीम इंडियाने 2007 मध्ये टी 20 आणि 28 वर्षांनंतर 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. श्रीसंथ या दोन्ही वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता.  


श्रीसंथने 2007 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन मिस्बाह उल हकचा घेतलेला कॅच आजही प्रत्येक क्रिकेटपटूच्या लक्षात आहे. श्रीसंथने या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.