Team India For New Zealand Tour : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा (Team India) करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) नंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून सोमवारी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केलीये. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून हार्दिक पंड्या (Hardik Pandya)  हा टी20 टीमचा कर्णधार असणार आहे. तर वनडे टीमची जबाबदारी शिखर धवनकडे (Shikar dhawan) असणार आहे.


न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक


वनडे सीरीजसाठी टीम इंडिया:


शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज़ अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक


न्यूजीलंड दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी या खेळाडूंना आराम देण्यात आलाय. टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतर हे खेळाडू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहेत.


Ind vs NZ टी-20 सीरीज


  1. 18 नोव्हेंबर, शुक्रवार: पहिली टी-20, वेलिंगटन

  2. 20 नोव्हेंबर, रविवार: दुसरी टी-20, माउंट माउंगनुई

  3. 22 नोव्हेंबर, मंगळवार: तीसरी टी-20, ऑकलँड


NZ vs Ind वनडे सीरीज


  1. 25 नोव्हेंबर, शुक्रवार: पहली वनडे, ऑकलँड

  2. 27 नोव्हेंबर, रविवार: दुसरी वनडे, हैमिल्टन

  3. 30 नोव्हेंबर, बुधवार: तीसरी वनडे, क्राइस्टचर्च