मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी आपण उपलब्ध आहोत. बीसीसीआयकडे (BCCI) आपण कधीही विश्रांतीची मागणी केलेली नाही, असं टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितलं आहे. तसेच माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये (Rohit Shamra) कोणतेही मतभेद नसल्याचंही विराटने स्पष्ट केलंय. (team india former captain runmachine virat kohli give reaction on captaincy and rohit sharma controversy in press confrence)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटचं कर्णधारपद गेल्यानंतर तो नाराज असल्याचं आणि रोहितसोबत वाद झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. मात्र आमच्यात असं काहीही झालेलं नाही. रोहितसोबत माझं मतभेद नाही. निवड समितीच्या निर्णय मला मान्य आहे, त्यावर माझा आक्षेप नाही. तसेच माझ्या कृतीतून टीम इंडियाला कमीपणा दाखवण्याचा हेतू नाही, असं विराटने स्पष्ट केलं.



टीम इंडियाचा आफ्रिका दौरा


टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होतेय. दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरिजने होणार आहे. त्यानंतर वनडे सीरिज होणार आहे. रोहित शर्मा वनडे टीमचं नेतृत्व करणार आहे. 


त्या वृत्ताचं विराटकडून खंडण


रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या या टीममध्ये विराट कोहली उपलब्ध नसेल. कौटंबिक कारणास्तव त्यानं बीसीसीआयकडे विश्रांती मागितल्याचं वृत्त होतं. मात्र विराटनं हे वृत्त फेटाळून लावलंय. मी वन-डे सीरिजसाठी उपलब्ध आहे. आमच्याच कोणताही बेबनाव नाही असं विराटनं स्पष्ट केलं. 


टेस्ट सीरिजसाठी दोन्ही टीम


टीम इंडिया 


विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज.


राखीव खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.


आफ्रिका टीम 


डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर. 


कसोटी मालिका 


पहिला सामना, 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  


दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  
  
तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.