मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होण्याच्या काही तास आधी टीम इंडियातील गोलंदाजासाठी आनंदाची तर भारतासाठी अभिमानाची बातमी येत आहे. भारतीय संघातील एका गोलंदाजाला तर भारतीय महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना ICCकडून  प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आलं आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित ओव्हरच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आयसीसीच्या 'बेस्ट प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड' साठी नामांकन करण्यात आलं आहे. 



आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आयसीसीने गुरुवारी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली. भुवनेश्वर व्यतिरिक्त पुरुष गटात अफगाणिस्तानचा अव्वल लेग स्पिनर राशिद खान आणि झिम्बाब्वेचा सीन विल्यम्स यांचा समावेश आहे. तर महिला गटात भारताच्या राजेश्वरी गायकवाड, दक्षिण आफ्रिकेची लिझल ली आणि भारताची पूनम राऊत यांचा सामवेश आहे.


मार्चमध्ये भुवनेश्वर कुमारने इंग्लंड विरुद्ध 3 वन डे सामने खेळले होते. त्यामध्ये त्याने 4.65 च्या इकॉनॉमी रेटने 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने इंग्लंडविरुद्ध 5 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत ज्यात 6.38 च्या इकॉनॉमी रेटने 4 विकेटस घेतल्या होत्या.