मुंबई : चेन्नईविरुद्ध कोलकाता संघाने शानदार विजय मिळवला. विजयाचा खरा हिरो ठरला तो शुभमन गिल. त्याने नाबाद ५७ धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. मात्र कोलकाताच्या विजयात आणखी एका खेळाडूची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरली. तो खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक. संयमीपणे खेळ करुनही प्रतिस्पर्धी संघाला मात देता येते हे त्याने त्याच्या कामगिरीवरुन दाखवून दिले. निदहास ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यातही दिनेशने जबरदस्त कामगिरी केली होती. अखेरच्या सामन्यात सर्वांनी भारताच्या विजयाच्या आशा गमावल्या होत्या. मात्र मोक्याच्या क्षणी दिनेशने दमदार खेळ करताना संपूर्ण सामन्याचे चित्रच पलटवले. दिनेशने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईविरुद्ध दिनेशने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईने ११७ धावांची खेळी केली. कोलकातासाठी हे आव्हान मोठे नव्हते. मात्र तितकेच सोपेही नव्हते. कोलकाताने पहिल्या तीन विकेट झटपट गमावल्या. ११.४ षटकांत ९७ धावांवर कोलकाता संघाच्या चार विकेट पडल्या होत्या. यावेळी संघ ११च्या सरासरीने धावा करत होता.



कोलकातासाठी हा सामना जिंकणे तितकेसे कठीण नव्हते. कारण प्रतिस्पर्धी संघात महेंद्रसिंग धोनी होता. तो कधी काय करेल याचा नेम नसतो. कोलकाताच्या चार विकेट पडल्यानंतर खुद्द कमेंटेटर म्हणत होते हा सामना चेन्नईच्या बाजूने आहे. मात्र कार्तिकने संयमी खेळी करताना हळूहळू धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. १७व्या आणि १८व्या ओव्हरमध्ये गेल्यानंतर त्याने गिअर बदलला. यानंतर कोलकात्याने विजय मिळवला होता. 


आयपीएलमधील गेल्या पाच सामन्यांतील दिनेश कार्तिकने केलेली फलंदाजी


स्ट्राइक रेट   रन     बॉल 
190.00      19     10
182.60      42*    23
153.57      43     28
100.00      18     18
230.00      23     10
250.00      45*   18