जयपूर : टीम इंडियाचं (Team India) टी 20 वर्ल्ड कप 2021 (T 20 World Cup 2021) मधील आव्हान साखळी सामन्यातच आव्हान संपुष्टात आंल. साखळी फेरीत पाकिस्ताननंतर न्यूझीलंडने टीम इंडियाचा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर आता टीम इंडिया पुन्हा न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यावर (New Zealand Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहेत. टीम इंडियाला या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. (team india have chances to take revange against new zealand in t 20 and test series) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या या दौऱ्याची सुरुवात ही टी 20 मालिकेने होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच टी 20 मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्माचा चांगली कामगिरी करण्याचा मानस असणार आहे. टी 20 मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 


टी 20 मालिकेनंतर 2 मॅचची टेस्ट सीरिज खेळण्यात येणार आहे. यातील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे पहिल्या सामन्यात नेतृत्व करणार आहे. 


टीम इंडिया वचपा घेणार का?


न्यूझीलंडने टीम इंडियाचा 23 जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. तसेच आता नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी सामन्यातही एकतर्फी परपाभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाकडे दोन्ही मालिंकामध्ये पराभूत करुन या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. टीम इंडिया वचपा घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.  


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.


टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स. 


टी 20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर. 


दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची. 


तिसरा सामना, रविवार, कोलकाता. 


कसोटी मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.   


दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.