मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या घडीला भारतीय संघाच्याच मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्त करण्यात आलेल्या राहुल द्रविड याच्या नावाला क्रिकेट विश्वात चांगलं वजन आहेय. कसोटी क्रिकेटमध्ये द्रविड खेळपट्टीवर तग धरून राहिला, की विरोधी संघाचे धाबे दणाणलेच म्हणून समजा. (Rahul Dravid)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या 'द वॉल' द्रविडला त्याच्या शांत आणि विनम्र स्वभावासाठीही ओळखलं जातं. पण, हाच शांत स्वभावाचा द्रविड जेव्हा विषय प्रेमाचा येतो, तेव्हा मात्र त्याचं वेगळेपण सिद्ध करुन जातो. म्हणूनच की काय त्याची आणि पत्नी विजेता पेंढारकरची प्रेमकहाणी तितकीच रंजक आहे. 


विजेताचे वडील भारतीय वायुदलात विंग कमांडर पदावर सेवेत होते. ज्यामुळं देशातील विविध ठिकाणी त्यांची बदली होत असे. यादरम्यानच  1968 - 71 मध्ये तिच्या वडिलांची बदली बंगळुरू येथे झाली. जिथे द्रविड आणि विजेताची पहिली ओळख झाली. 


दोघांच्याही कुटुंबांमध्येही चांगलं नातं पाहिलं गेलं. याचदरम्यान राहुल आणि विजेताची मैत्रीही आणखी दृढ झाली, पुढे जाऊन हे दोघं एकमेकांवर प्रेम करु लागले. दरम्यानच्या काळात राहुल विजेताला भेटण्यासाठी वेळ काढत होता. ज्यामुळं तिच्या मित्रपरिवाराला या दोघांचं नेमकं काय सुरुये असे प्रश्न पडू लागले. 


2002 मध्ये विजेतानं सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. याच वर्षी राहुल द्रविड आणि विजेताचं लग्नही ठरलं. पण, 2003 मध्ये राहुलला विश्वचषकासाठी रवाना व्हायचं होतं, ज्यामुळं कुटुंबीयांना लग्नाची प्रतिक्षा करावी लागली. 


विजेताची मैदानात हजेरी... 
विश्वचषकाआधी राहुल आणि विजेताचा साखपुडा झाला होता. ज्यानंतर ती त्याला चिअर करण्यासाठी म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेली होती. विश्वचषकाच्या दौऱ्याहून परतल्यावर 4 मे 2003 ला दोघांनीही बंगळुरूमध्ये पारंपरिक रितींनुसार लग्नगाठ बांधली. 


राहुल द्रविड आणि त्याच्या पत्नीचं प्रेमच खऱ्या अर्थानं 'विजेता' ठरलं. पुढे या जोडीनं अनेकांपुढेच एक आदर्श विवाहित जो़डपं म्हणून उदाहरण ठेवलं.