मुंबई : रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाचा एकदिवसीय आणि टी 20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहितला मात्र यानंतर दुखापतीने ग्रासलं. यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावं लागलं. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहितला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. (team india odi captain hitman rohit sharma might be out of one day series against south africa after test series due to injurey) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रोहित आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही, याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही, याबाबत मोठा खुलासा झाला आहे.


इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, रोहित दुखापतीतून सावरताना दिसतोय. तो हळूहळू फिट होतोय. रोहित पहिल्या फिटनेस टेस्टमध्येही यशस्वीरित्या पास झाला आहे. टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.       


मुंबईत आफ्रिका दौऱ्याआधी सरावादरम्यान थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र आणि रोहित शर्मा सराव करत होते. या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती. 


यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंगचा त्रास असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. यामुळे रोहितला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. रोहितच्या जागी गुजरातच्या प्रियांक पांचाळला संधी देण्यात आली. 


दरम्यान रोहित दुखापतीतून पूर्णपणे फिट होवून एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसावा, अशी आशा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.