Team India चा ढासळता फॉर्म पाहता Coach राहुल द्रविडने उचललं पाऊल, बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं की...
टी 20 वर्ल्डकप 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला विजयी ट्रॅक आणण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) तयारीला लागला आहे.
Coach Rahul Dravid Strategy For Team India: टी 20 वर्ल्डकप 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला विजयी ट्रॅक आणण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) तयारीला लागला आहे. आशिया कपमधील पराभवामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने त्यात भर पडली आहे. रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला टी-20विश्वचषकाची तयारीसाठी मास्टर प्लान (Team India Master Plan) तयार केला आहे. त्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडनं बीसीसीआयसमोर दोन मागण्या ठेवल्या आहे.
इंडियन एक्स्प्रेसमधील बातमीनुसार, राहुल द्रविडने बीसीसीआयला टी-20 विश्वचषकापूर्वी अधिक सराव सामने आयोजित करण्यास सांगितले आहे. तसेच तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी संघ नियोजित वेळेच्या एक आठवडा आधी ऑस्ट्रेलियाला पोहोचेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतरच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही काही संघांशी चर्चा करत आहोत. आयसीसीने आयोजित केलेल्या सराव सामन्यांव्यतिरिक्त आमच्यासोबत सामने खेळतील. द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफसह T20 वर्ल्डकपचा संपूर्ण संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाला 2 सराव सामने खेळायचे आहेत. 17 आणि 18 ऑक्टोबरला हे दोन सराव सामने होणार आहेत. 17 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे, तर 18 ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.