WTC FINAL : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी सिझनची सुरुवात मार्च महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. मुळात म्हणजे, याचा अंतिम सामना जून महिन्यात खेळवला जाण्याची शक्यता आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये टीमची (IPL Teams) संख्या वाढल्याने सामन्यांची संख्याही वाढणार आहे. 10 टीम्सची लीग असल्याने आता आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक जुळवण्यात अडचणी येणार असल्याचं चिन्ह आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) फायनल सामन्याची तारीख ही आयपीएलच्या फायनल तारखेच्या एकदमच जवळ असू शकते. आयसीसी WTC ची स्पर्धा 7 जून ते 11 जूनच्या मध्ये ठेवू शकते. तर बीसीसीआय सध्या आयपीएलच्या स्पर्धेच्या फानलची तारीख ठरवतेय. त्यामुळे अंदाजानुसार, याचा फायनल सामना 4 जूनला होऊ शकतो. अशावेळी भारतीय खेळाडूंसाठी हे फार कठीण होऊ शकतं.


जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी क्वालिफाय केलं तर, टीम मॅनेजमेंटला दोन्ही इव्हेंटच्या शेड्यूलसंदर्भात काळजी घ्यावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये भारताची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. भारत 52.08 परसेंटेज पॉइंट्सोबत चौथं स्थान पटकावलंय. तर श्रीलंका (53.3) तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया (72.7) ने पहिल्या क्रमांकावर तर, दक्षिण आफ्रिका (60) दुसऱ्या क्रमांकावर आहे.


फायनलमध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया


चौथ्या नंबरवर असूनही टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची दाट शक्यता मानली जातेय. यासाठी टीम इंडियाला आगामी 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. जर टीम इंडिया यामध्ये यशस्वी झाली तर पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक देणार आहे. 


खेळाडूंच्या कामगिरीवर होणार परिणाम


टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळाला नाही. टी-20 वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड आणि बांगलादेशची सिरीज खेळावी लागली आहे. येत्या वर्षातही टीमचं शेड्यूल व्यक्त आहे. अशातच आयपीएल येणार असल्याने WTC च्या फायनलमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.