मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीच्या वाढदिवशी कर्णधार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटर्सने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. शिखर धवन, हार्दिक पांड्या, आर अश्विन, अजिंक्य रहाणे सह अनेकांनी धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनी कर्णधार असताना भारताने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियंस ट्रॉफी जिंकली होती. 


विराटने धोनी सोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, 'हॅप्पी बर्थडे माही भाई, तुम्ही नेहमी फिट आणि खूश राहा. God bless you'.



हार्दिक पंड्या म्हणतो की, 'माझे बिट्टू तुम्हाला चिट्टू कडून हॅप्पी बर्थडे. माझे मित्र ज्यांनी मला चांगला व्यक्ती होणं शिकवलं आणि माझ्या वाईट वेळेतही नेहमी माझ्या सोबत उभे राहिले.'



शिखर धवन म्हणतो की, 'खेळाच्या या लेजेंडला जन्मदिनाच्या शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे माही भाई.'