मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 1 जुलैपासून शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. यामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआय आणि इग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय़ घेत खेळाडूंवर काही निर्बंध आणले होते. मात्र तरीही संघातील खेळाडू पॉझिटीव्ह आढळल्यानंतर देखील अनेक खेळाडू नियमांचे उल्लघन करताना दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. बीसीसीआयने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. यापूर्वी आर अश्विन आणि विराट कोहली यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 


बीसीसीआयने खबरदारी म्हणून खेळाडूंनी गर्दीपासून दूर राहावे, अशा कडक सूचना दिल्या होत्या. असे असूनही भारतीय खेळाडूना याचे गांभीर्य दिसत नाही आहे. सराव सामन्यादरम्यान रिषभ पंतने नियम मोडला आहे. रिषभ पंत चाहत्यांमध्ये पोहोचला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला. आता त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतवरही टीका होत आहे. 


दरम्यान याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये मास्कशिवाय फिरताना आणि चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसले होते. त्याचवेळी, आजही कोहलीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो बाजारात एकटाच फिरत आहे. विराटने मास्कही लावलेला नाही.