टीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
कोलंबो : १४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे. फायनलमध्ये भारताची लढत तीन वेळची वर्ल्ड चॅम्पियन टीम इंग्लंडशी होणार आहे. कागदावर यजमान इंग्लिश टीम मजबूत आहे. मात्र, वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमची कामगिरी पाहता आणि सेमी फायनलमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन कांगारुंना दिलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे मिथालीची टीमही विजयासाठी फेव्हरेट असेल.
भारतीय महिला टीमला फायनलमध्ये धडक दिल्याने भारतीय पुरुष संघाने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तेथे ३ टेस्ट, ५ वनडे आणि एक टी-20ची सीरिज खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली आहे. तब्बल ८ वर्षानंतर भारत आणि श्रीलंका एका सिरीजमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत.
२६ जुलैला भारत श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर कोलंबो आणि कँडीच्या मैदानावर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. डम्बुला येथे पहिली वनडे २० ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर कँडी आणि कोलंबोमध्ये प्रत्येकी दोन वनडे खेळवल्या जातील. तर ६ सप्टेंबरला भारत-श्रीलंका यांच्यात एकमेव टी-२० खेळवली जाणार आहे.