Team India Selector:  टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) मिळालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने (BCCI) चेतन शर्मा (Chetan Sharma) आणि सिलेक्शन टीमना (Team Selection) नारळ देण्यात आला होता. बीसीसीआयने तडकाफडकी सिलेक्शन कमिटी बरखास्त केली होती. त्यानंतर आता टीम इंडिया नव्या सिलेक्टर्सच्या शोधात आहे. यासाठी बीसीसीआयने एप्लिकेशन जारी केलेल होते. दरम्यान हे एप्लिकेशन करण्याची डेडलाईन आज म्हणजेच सोमवारी संपली आहे. याचाच आतापासून पुढे नव्या सिलेक्टरसाठी कोणीही अप्लाय करू शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या नोकरीसाठी एकूण 80 एप्लिकेशन मिळाले आहेत. टीम इंडियासाठी एकूण 5 सिलेक्टर्सची समिती बनवण्यात येते. यामध्ये एक चीफ सिलेक्टर असतो. आतापर्यंत एकूण 80 लोकांनी या पदांसाठी अप्लाय केल्याची माहिती आहे. यानंतर आता बोर्डाला याबाबत निर्णय घ्यायचा आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नवी समिती तयार होऊन ती जाहीर करण्यात येणार असल्याची आशा आहे.


या दिग्गज व्यक्तीचा पत्ता होणार कट?


इनसाईड स्पोर्ट्सने केलेल्या दाव्यानुसार, माजी क्रिकेटर लक्ष्मण शिवरामकृष्णन देखील सिलेक्टर बनण्याच्या रेसमध्ये आहेत. मात्र त्यांची या जागी निवड होणं कठीण आहे. याचं कारण म्हणजे, ज्युनियर टीमत्या सिलेक्शन कमिटीमध्ये साऊथ झोनच्या शरथ श्रीधरन यांचा समावेश आहे. अशात बीसीसीआय निवड समितीमध्ये एकाच झोनमधील दोन सिलेक्टर्सचा समावेश टाळण्याचा प्रयत्न करेल.


सिलेक्शन समितीमध्ये समावेश होण्यासाठी 2 मोठी नावं समोर आली आहेत. यामध्ये माजी खेळाडू अजित आगरकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, नयन मोंगिया तसंच इतर काही मोठ्या नावांचा समावेश आहे. आता एप्लिकेशन देण्याची अखेरची तारीश समाप्त झाली आहे तर सीबीबीआयकडून इंटरव्ह्यू प्रोसेस सुरु केली जाईल.


सिलेक्शन समितीसाठी कोणाची नावं चर्चेत


  • अजित आगरकर (26 टेस्ट, 191 वनडे)

  • नयन मोंगिया (44 टेस्ट, 140 वनडे)

  • लक्ष्मण शिवरामकृष्णन (9 टेस्ट, 16 वनडे)

  • सलिल अंकोला (1 टेस्ट, 20 वनडे)


निवड समितीत कोण होतं?


चेतन शर्मा (उत्तर विभाग) यांच्याबरोबर  हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबांशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा निवड समितीत समावेश होता. यांच्यातील काही सदस्यांची नियुक्ती 2020 मध्ये करण्यात आली होती.