केपटाऊन : टीम इंडियाची आजपासून दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टेस्ट सामन्याच्या माध्यमातून खरी टेस्ट होणार आहे. आजपासून टेस्ट सीरिजला सुरूवात होणार आहे. लगातार ९ सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारताबाहेर सामने खेळण्यासाठी गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या २०१८-१९ च्या सत्राची सुरूवात दक्षिण आफ्रिकेत तीन टेस्टने होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावरही जायचे आहे. त्यामुळे हा दौरा कर्णधार विराट कोहली आणि टीमसाठी महत्वाचा आहे. 


कधी कुठे बघाल सामना?


टीम इंडियाच्या यशाची मोठी जबाबदारी या दौ-यात गोलंदाजांवर निर्भर असणार आहे. जगातली नंबर एक टीम टीम इंडियाने दुस-या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर आधीपासूनच दबाव कायम केला आहे. जर टीमने इथेही चांगलं प्रदर्शन कायम ठेवला तर टीम इंडियाला आपला क्रमांक पहिला गमावणार नाही. आजच्या पहिल्या सामन्याचं प्रसारण दुपारी २ वाजता सोनी टेन १ वाहिनीवर इंग्रजीत आणि सोनी टेन ३ वर हिंदीत होणार आहे. 


टीम इंडियाचा आत्मविश्वास


दक्षिण आफ्रिका टीमला आशा आहे की, त्यांचे वेगवान गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांची फळी भेदतील. पण लागोपाठ ९ सीरिज जिंकल्यावर टीम इंडियाचा विश्वास सातव्या आसमानावर आहे.


कुणाला मिळणार संधी?


यावेळी टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी क्रम मजबूत आहे. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया कमीत कमी तीन वेगवान गोलंदाजांना मैदानाता उतरवेल. त्यात भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तब्येत बिघडल्यामुळे रविंद्र जडेजा खेळण्याची शक्यता कमी आहे. अशात एकच स्पिनर तो म्हणजे रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. रोहित शर्मा अतिरीक्त फलंदाजासोबत उतरू शकतो तसेच ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्याला संधी दिली जाऊ शकते. 


टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याची शक्यता कमीच आहे. सलामी फलंडाज शिखर धवन फिट असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तो मुरली विजयसोबत सुरूवात करण्यासाठी तयार आहे. अशात लोकेश राहुलला बाहेर बसवावं लागेल. अजिंक्य रहाणे सध्या फॉर्ममध्ये नसला तरी त्याला बाहेर बसवण्याची शक्यता कमीच आहे. 


डेल स्टेनबाबत साशंकता


टीम इंडियाप्रमाणे दक्षिण आफ्रिका टीमच्या निवडीबाबत अजून स्पष्टता नाहीये. डेल स्टेनला फिट घोषित करण्यात आले आहे, पण त्याचं खेळणं निश्चित नाहीये.


एबी डिविलियर्सचीही चिंता


कागिसो रबादा, वर्नन फिलेंडर आणि मोर्ने मोर्कल हे वेगवान गोलंदाज खेळू शकतात. प्रश्न आहे एबी डिविलियर्सचा. डिविलियर्स झिम्बॉब्वे विरूद्ध कर्णधार होता. पण तेव्हापासून फाफ डु प्लेसिस कर्णधार आहे. डिविलियर्स जर फिट झाला तर त्याला संधी देण्यासाठी टीममधून ऑलराउंडरला बाहेर केलं जाऊ शकतं.