Ravichandran Ashwin मुळे जादुई स्पिनरचं करिअर संपलं, पाहा कोण `तो`
रविचंद्र अश्विनमुळे जादुई स्पिनरचं करिअर उद्ध्वस्त, नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास
मुंबई : भारताचा स्टार आणि दिग्गज स्पिनर आर अश्विन आपल्या घातक गोलंदाज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या गोलंदाजीला दिग्गज फलंदाजही घाबरतात. भारतात कसोटी क्रिकेटमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. आर अश्विननं टी 20 क्रिकेटमध्येही पदार्पण केलं आहे. अश्विनमुळे मात्र जादुई स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
आर अश्विनमुळे धोनीच नाही तर त्यापाठोपाठ विराटनंही या जादुई स्पिनरला संधी दिली नाही. त्यामुळे अखेर या गोलंदाजावर संन्यास घेण्याची वेळ आली आहे. 6 वर्ष या खेळाडूला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला.
महेंद्रसिंह धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हाच आर अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. धोनीने हरभजन ऐवजी आर अश्विनला जास्त संधी दिली.
हरभजन सिंग 2016 मध्ये UAE विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर 6 वर्ष त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. त्यानंतर हरभजन सिंगने 24 डिसेंबर 2021 रोजी निवृत्तीची घोषणा केली.
हरभजनच्या निवृत्तीनंतर घरच्या मैदानावरील सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळाली. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आर अश्विनची जागा मजबूत झाली. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलचंही संघातील स्थान निश्चित झालं.
आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे हरभजन सिंगला संघात परतणं कठीण झालं आहे. त्यामुळे अखेर हरभजनने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूंपैकी हरभजन सिंग एक होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने हा विक्रम केला होता. 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने महत्त्वाची भूमिक निभावली होती. चाहते त्याला टर्बनेटर असंही म्हणायचे. अनिल कुंबळे आणि हरभजनची जोडी खूप प्रसिद्ध होती.
रोहित शर्मा मुंबई संघाचा कर्णधार झाल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून हरभजन सिंगला खेळण्याची संधी देण्यात आली होती. 2017 मध्ये हरभजन सिंग मुंबई संघाकडून खेळला होता. आपल्या करियरमध्ये 103 कसोटी सामने खेळून 417 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
वन डेमध्ये 236 सामने खेळून 269 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी 20 मध्ये 28 सामने खेळून 25 विकेट्स घेतल्या. IPL मध्ये 163 सामने खेळून 150 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी हरभजन सिंग कोलकाता संघाकडून खेळला होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्याला संधी देण्यात आली नाही.