Team India squad against Afghanistan : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडिया जोरदार तयारीला लागली आहे. येत्या 11 जानेवारीपासून भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG T20I) यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जात असतानाच आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India squad) घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवला आराम देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच कॅप्टन


रोहित शर्माने मागील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपासून एकही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळला नाही. त्यामुळे त्याला संधी मिळेल की नाही? अशी चर्चा सुरू होती. अशातच आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जोरदार कमबॅक करत टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. तर संजू सॅमसन, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संधी दिली गेल्याने अनेकांनी भूवया उंचवल्या आहेत. 


सूर्या आणि हार्दिकला डच्चू


सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या दोन्ही खेळाडूंपैकी कोण कॅप्टन होणार? यावर चर्चा सुरू होती. मात्र, आता या दोन्ही खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहितनंतर कोण? या प्रश्नावर चर्चा तर होतच राहणार की काय? असा प्रश्न देखील विचारला जातोय.


अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.


भारत दौऱ्यासाठी अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 


इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.


भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक


पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली
दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर
तिसरा T20- १७ जानेवारी- बंगळुरू