Team India : `आता मला कधीच संधी मिळणार नाही`, टीम इंडियाच्या खेळाडूची खंत
भारताने चिर प्रतिद्वंदी पाकिस्तानवर (IND vs PAK) सनसनाटी विजय मिळवला. या विजयात टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंसह युवा क्रिकेटपटूंनीही योगदान दिलं.
मुंबई : टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड कप (T 20 World Cup 2022) मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने चिर प्रतिद्वंदी पाकिस्तानवर (IND vs PAK) सनसनाटी विजय मिळवला. या विजयात टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंसह युवा क्रिकेटपटूंनीही योगदान दिलं. वर्ल्ड कपच्या या सर्व धामधुमीत आज (25 ऑक्टोबर) टीम इंडियाच्या विकेटकीपर बॅट्समनचा वाढदिवस आहे. या खेळाडूला टीम इंडियात अनेक महिन्यांपासून संधी मिळालेली नाही. माझी टीम इंडियात आता कधीच निवड होणार नाही, अशी खंत या क्रिकेटरने बोलून दाखवली. (team india star wicketkeeper batsman wriddhiman saha birthday his played last test match to december 2021 against new zealand)
ऋद्धीमान साहाचा (Wriddhiman Saha) आज 38 वा वाढदिवस आहे.साहाला संघात सातत्याने कधीच संधी मिळालेली नाही. त्यामुळे ऋद्धीमाननेही संघात संधी मिळण्याची अपेक्षा सोडलीय. "माझी आता कधीच निवड केली जाणार नाही", असं विधान ऋद्धीमानने जून 2022 मध्ये केलं होतं. ऋद्धीमानने त्याचा अखेरचा कसोटी सामना 3 डिसेंबर 2021 ला न्यूझीलंड विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला होता. साहाऐवजी संघात अधूनमधून श्रीकर भरतची राखीव विकेटकीपर म्हणून निवड केली जातेय.
साहा काय म्हणाला होता?
"आता टीम इंडियात माझी निवड होईल असं समजू नका. कोच आणि सिलेक्टर्सनी मला संघात संधी मिळणार नाही अशी पूर्वकल्पना दिली होती. सिलेक्टर्सना माला संधी द्यायची असती तर माझ्या आयपीएल कामगिरीच्या जोरावर मी इंग्लंड दौऱ्याचा भाग होऊ शकलो असतो. पण मला फक्त क्रिकेट खेळण्याची चिंता आहे. जोपर्यंत मला बरं वाटतय तोवर मी खेळणार", असं ऋद्धीमानने स्पष्ट केलं होतं.