शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड
आज होणा-या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड आहे.
मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत 4-1 ने विजयी आघाडी घेतलीय. आज होणा-या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड आहे. 5-1 अशा फरकाने मालिका विजयाचे लक्ष्य भारतीय संघाचे आहे.
दुस-या फळीला संधी देण्याची शक्यता
या लढतीत भारताचा कर्णधार विराट कोहली दुस-या फळीला संधी देण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, महंमद शमी आणि शार्दुल ठाकुर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रतिष्ठा राखण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ खेळणार
यामुळे प्रमुख खेळाडूंना विश्रांतीही मिळेल. तर दुसरीकडे प्रतिष्ठा राखण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ खेळणार आहे. सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आतापर्यंत भारताचे दक्षिण आफ्रिकेविरोधात सहा सामने त्यातील त्यापैकी तीन सामने भारताने जिंकलेत. तर एक अनिर्णित राहिलाय.