टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेत घेतले भाड्याने मैदान
या दौऱ्यासाठी असे निर्णय घेण्यात येत आहेत जे याआधी कधी घेतले गेले नव्हते.
नवी दिल्ली : साऊथ आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला कोणतीच रिस्क घ्यायची नाहीए. त्यामूळे या दौऱ्यासाठी असे निर्णय घेण्यात येत आहेत जे याआधी कधी घेतले गेले नव्हते.
प्रॅक्टीस मॅच रद्द
५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीजआधीच्या दोन प्रॅक्टीस मॅच भारतीय मॅनेजमेंटने रद्द केल्या आहेत.
भाड्याने मैदान
टीम इंडिया साऊथ आफ्रिकेत एक फास्ट सेंट्रल विकेटचे मैदान भाड्याने घेणार आहे. या मैदानातच टीम इंडिया आपल्या खेळाची रणनिती आखणार आहे.
प्रॅक्टीस मॅचचा फायदा नाही
दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये यजमान बोर्ड टीम इंडियाला स्लो विकेटवर मध्यम गतीच्या बॉलर्सशी खेळवू शकतो. त्यामूळे अशा प्रॅक्टीस मॅचचा काहीच फायदा झाला नसता याची टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला माहिती होती.
२७ डिसेंबरला रवाना
'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडिया २७ डिसेंबरला आफ्रिकेसाठी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
बोर्डाचा एक अधिकारी याआधी एक दिवस जाऊन मैदान भाड्याने घेऊन बाकी औपचारीकता पार पाडेल.
चार एक्स्ट्रा बॉलर्स
टीम मॅनेजमेंटने नेट प्रॅक्टिससाठी चार एक्स्ट्रा बॉलर सोबत नेण्याची शिफारसही केली.
त्यानुसार मोहम्मद सिराज, अवेश खान, बैसिल थंपी आणि नवनीत सैनी हे फास्ट बॉलर टीम इंडियासोबत आफ्रिका दौऱ्यावर जातील.
विदेश दौऱ्याला सुरुवात
टीम इंडिया कोहलीच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस यशस्वी होत आहे. पण विदेशातही यश मिळाल्यास हे यश पूर्ण मानले जाईल. साऊथ आफ्रिका मॅचपासून या विदेशी दौऱ्यांची सुरूवात होणार आहे. त्यामूळे टीम मॅनेजमेंट या दौऱ्यात कोणतीच करस सोडत नाहीए.