टीम इंडियाचा बांग्लादेशशी मुकाबला, कुठे पाहाल हा सामना
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळालं आहे.
कोलंबो : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळालं आहे.
आता टीम इंडियासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. निडास टी 20 ट्रॉफीत आज बांग्लादेशसोबत टीम इंडिया दोन हात करणार आहे. टीम इंडियाला आपल्या खेळात सुधारणा करावी लागेल. श्रीलंकेला गेल्या 6 महिन्यात भारताने उत्तम खेळ दाखवला होता. त्यावेळी 37 चेंडूत 66 धावा करून शानदार खेळ दाखवला होता.
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्माने म्हटलं आहे की, युवा खेळाडू बांग्लादेशविरूद्ध चांगला खेळ दाखवणार आहेत. 5 विकेट गमावून हरल्यानंतर त्यांनी सांगितलं की, आमच्या बॉलरने प्रत्येक गोष्ट अनुभवली आहे. आमच्या बॉलर्सला देखील उत्तम अनुभव मिळाला आहे. ते चांगला खेळ दाखवतील यात शंका नाही. मला या सामन्यात भरपूर विश्वास आहे.
या कारणांमुळे टीम इंडिया श्रीलंकेकडून हरली
रोहितने दिलेल्या माहितीनुसार, खराब सुरूवात झाल्यानंतर आता टीम इंडियाने चांगला स्कोर करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. श्रीलंका विरूद्धच्या सामन्यात 9 रन करून दोन विकेट गमावल्या. रोहित आणि धवन बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात कशी सुरूवात करणार हे पाहणं जास्त गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
रोहित अंतिम आकड्यात सहभागी होईल असं काही नाही. अक्षर पटेलला चहलसोबत गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. अक्षर पटेल एक अनुभवी प्लेअर आहे. लोकशे राहुल पहिल्या सामन्यात शेवटच्या 10 मध्ये संधी मिळाली होती. मात्र सलामी जोडी ठरल्यामुळे काय होणार याकडे पाहणं महत्वाचं ठरेल.
दोन्ही संघात हे आहेत प्लेअर
भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन (उप कॅप्टन), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज और रिषभ पंत (विकेटकीपर).
बांग्लादेश : महमूदुल्लाह (कॅप्टन), लिटन दास, तमीम इकबाल, सौम्य सरकार मुश्फिकर रहीम, सब्बीर रहमान, मुस्तफिजुर रहमान, रूबेल हुसैन, अबु जायद, तास्किन अहमद, इमरूल कायेस, नुरूल हसन, मेहदी हसन, अरिफुल हक, नजमुल इस्लाम, अबु हिदर रॉनी.