मुंबई : टीम इंडियाची नवीन वर्षाची सुरुवात जरी टेस्ट मॅचनं करत असली तरी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मात्र लागल्यात त्या आयसीसी वर्ल्डकप (ICC World Cup 2019) कडे... यंदाच्या वर्षी वर्ल्डकप ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी टीम इंडिया एक टेस्ट आणि कमीत कमी १३ वन डे मॅच खेळणार आहे. टेस्ट मॅच ३ जानेवारी रोजी सिडनीमध्ये खेळलं जाईल. ही मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजची चौथी आणि शेवटची मॅच असेल. टीम इंडिया या सीरिजमधल्या दोन टेस्ट मॅच जिंकून २-१ नं पुढे आहे. टेस्ट सीरिजनंतर दोन्ही टीम्स १२ जानेवारीपासून वनडे मॅच खेळणार आहे.  


ICC  वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या मॅच
 
तारीख विरुद्ध  मॅच स्थान
३ - 7 जानेवारी  ऑस्ट्रेलिया  चौथी टेस्ट  सिडनी
१२ जनवरी ऑस्ट्रेलिया  पहली वन डे सिडनी
१५ जनवरी ऑस्ट्रेलिया  दुसरी वन डे  एडलेड
१८ जनवरी ऑस्ट्रेलिया  तिसरी वन डे मेलबर्न
२३ जनवरी न्यूझीलंड पहली वन डे  नेपियर
२६ जनवरी न्यूझीलंड दुसरी वन डे माउंट मोऊनगुई
२८ जनवरी न्यूझीलंड तिसरी वन डे माउंट मोऊनगुई
३१ जनवरी न्यूझीलंड चौथी वन डे हॅमिल्टन
३ फरवरी न्यूझीलंड पाचवी वन डे वेलिंग्टन
६ फरवरी न्यूझीलंड पहला टी २० वेलिंग्टन
८ फरवरी न्यूझीलंड दुसरा टी २० ऑकलंड
१० फरवरी न्यूझीलंड तिसरी टी २० हॅमिल्टन
२४ फरवरी ऑस्ट्रेलिया  पहली वन डे  मोहाली
२७ फरवरी ऑस्ट्रेलिया  दुसरी वन डे हैदराबाद
२ मार्च  ऑस्ट्रेलिया  तिसरी वन डे नागपूर
५ मार्च  ऑस्ट्रेलिया  चौथी वन डे नवी दिल्ली
८ मार्च  ऑस्ट्रेलिया  पाचवी वन डे नवी दिल्ली
१० मार्च ऑस्ट्रेलिया  पहली टी २०  बंगळुरू
१३ मार्च ऑस्ट्रेलिया  दुसरी टी २०  विशाखापट्टनम 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


टीम इंडिया यावर्षी सुरू होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी तीन देशांविरुद्ध कमीत कमी १३ वन डे खेळणार आहे. पहिल्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियामध्येच तीन वन डे मॅचची सीरिज खेळली जाईल. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. इथं भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पाच वनडे मॅचची सीरिज खेळली जाईल. यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर दाखल होईल. इथं दोन्ही टीम्स दरम्यान पाच वन डे मॅचचं आयोजन करण्यात आलंय.