मुंबई : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तिथे वन डे सीरिजनंतर टी 20 सीरिजही खेळवण्यात येणार आहे. यंदा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. या स्पर्धेआधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सामन्यांची सीरिज खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी 20 सामन्यांची सीरिज तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी 20 आणि 3 वन डे सामन्यांची सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्याचं संपूर्ण शेड्युल कसं असणार जाणून घेऊया. 


मोहाली- 20 सप्टेंबर पहिला टी 20 सामना 
नागपूर - 23 सप्टेंबर दुसरा टी 20 सामना
हैदराबाद-  हैदराबाद तिसरा टी 20 सामना


दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20 सामन्यांचं शेड्युल
तिरुवनंतरपुरम - 28 सप्टेंबर - पहिला टी 20 सामना 
गुवाहाटी- 1 ऑक्टोबर - दुसरा टी 20 सामना
इंदूर- 3 ऑक्टोबर - तिसरा टी 20 सामना


दक्षिण आफ्रिके विरुद्ध वन डे सामन्याचं शेड्युल
रांची 6 ऑक्टोबर- पहिला वन डे सामना
 लखनऊ 9 ऑक्टोबर- दुसरा वन डे सामना
दिल्ली 11 ऑक्टोबर- तिसरा वन डे सामना