India vs Afghanistan: अखेर वर्ल्डकपची सांगता झाली आहे. या स्पर्धेच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या टीमने सहाव्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर गुरुवारपासून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 सिरीज खेळायची आहे. यानंतर टीम इंडिया अशा एका देशाशी टी-20 सिरीज खेळणार आहे, ज्या टीमसोबत आतापर्यंत एकदाही टी-20 सिरीज खेळली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे टीम इंडिया ऑस्ट्रेलियन टीमसोबत टी-20 सिरीज खेळणार आहे. तर दुसरीकडे अशी एक टीम भारतात येणार आहे, ज्यांच्यासोबत भारताने आतापर्यंत एकही वनडे किंवा टी-20 सिरीज खेळलेली नाही. ही टीम दुसरी तिसरी कोणतीही टीम नसून अफगाणिस्तानची क्रिकेट टीम आहे. अफगाणिस्तानची क्रिकेट टीम पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. नुकतंच बोर्डाने याबाबत घोषणा केली आहे.


दीर्घकाळापासून भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना व्हावा यासाठी चर्चा सुरु होती. या चर्चेनंतर अखेर कार्यक्रमही जाहीर झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारीमध्ये 3 टी-20 सामन्यांची सिरीज होणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी मान्यता दिलीये.


यानुसार, या सिरीजतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये रंगणार आहे. 3 सामन्यांची सिरीज असल्याने तिसरा सामना 17 जानेवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे.


पहिल्यांदा रंगणार व्हाईट बॉल सिरीज


दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच पांढऱ्या बॉलची सिरीज रंगणार आहे. अफगाणिस्तान आणि भारताची टीम केवळ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषकादरम्यान व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही टीम्समध्ये केवळ एकच टेस्ट सामना खेळला गेलाय.


कशी असणार आहे अफगाणिस्तानविरूद्धची सिरीज


पहिला T20I सामना – 11 जानेवारी, मोहाली
दुसरा T20I सामना – 14 जानेवारी, इंदूर
तिसरा T20I सामना – 17 जानेवारी, बंगळुरू


टी-20 मध्ये कसा आहे दोन्ही टीम्सचा रेकॉर्ड?


दोन्ही टीम्समधील हेड-टू-हेड पाहिलं तर तर ते आतापर्यंत पाच टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडिया विरूद्ध अफगाणिस्तान आमने-सामने आले आहेत. त्यापैकी सर्व टीम इंडियाने जिंकले आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील अफगाणिस्तानच्या टीमने कामगिरीबद्दल इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध विजय नोंदवला होता.