मॅंचेस्टर : टीम इंडिया आणि वेस्टइंडिज टीमचा सामना आज खेळला जाणार आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही मॅच गमावलेली नाही. टीम इंडियाने एकूण ५ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी ४ मॅच जिंकल्या आहेत, तर एक मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. टीम इंडिया पाँइट्स टेबलमध्ये ९ पाँइट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


दुसऱ्या ठिकाणी वेस्टइंडिज टीमकडून यंदाच्या वर्ल्डकपमध्ये निराशाजनक कामगिरी झाली आहे. वेस्टइंडिज टीमने एकूण ६ मॅच खेळल्या आहेत. यापैकी ४ मॅचमध्ये पराभव झाला आहे, तर एक मॅच रद्द आणि तर केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. 


वेस्ट इंडिजच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. इव्हिन लेविसऐवजी  सुनील एम्ब्रिज याला तर एश्ले नर्सच्या जागी फॅबिअन एलनसा संधी देण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


दोन्ही टीमसाठी आजची मॅच महत्वाची असणार आहे. आजची मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल. तर वेस्टइंडिजचा ही मॅच जिंकून आपली अब्रु बचावण्याचा प्रयत्न करतील.


आमने-सामने 


वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया-वेस्टइंडिज टीममध्ये एकूण ८ सामने खेळले गेले आहेत. यातील ५ मॅच इंडियाने जिंकल्या आहेत. वेस्टइंडिजला ३ मॅच जिंकण्यास यश आले आहे.


कालरेस ब्रॅथवेट आणि ख्रिस गेल


टीम इंडियाच्या बॉलरसमोर कालरेस ब्रॅथवेट आणि ख्रिस गेल या दोन्ही आक्रमक बॅटसमनना रोखण्याचे आव्हान असणार आहे. हे दोन्ही बॅटसमन सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे या दोघांना स्वसत्यात बाद करावे लागणार आहे.    


 


टीम इंडिया : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कॅप्टन), केदार जाधव,  महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, विजय शंकर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, 


टीम वेस्ट इंडिज: क्रिस गेल, सुनील एम्ब्रिस, शाई होप, निकोलस पूरन, शिम्रॉन हेटमायर, जेसन होल्डर, कार्लोस ब्रॅथवेट, फैबियन ऍलन, केमार रोच, शेल्डन कॉटरेल, ओशेन थॉमस