कोलकाता : भारताचा पहिल्या डे-नाईट सामन्यात दणदणीत विजय झाला आहे. भारताने टेस्ट सिरीज ही २-० ने जिंकली आहे. कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने एक इनिंग आणि ४६ रनने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा सामना जिंकला आहे. याआधी भारताने इंदूर टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी एक इनिंग आणि १३० रनने बागंलादेशचा पराभव केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डे-नाइट टेस्टमध्ये टॉस जिंकत आधी बांगलादेशने बॅटींग करण्याचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या इनिंगमध्ये बांगलादेश टीम १०६ रनवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाने ९ विकेट गमवत ३४७ रन केले होते. भारताने पहिल्या इनिंगमध्ये २४१ रन्सची लीड घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये बांगलादेशची टीम १९५ रनवर ऑलआऊट झाली.


दुसऱ्या इनिंगमध्ये ही बांगलादेशची सुरुवात खराब झाली. ईशांतने पहिल्याच ओव्हरमध्ये शादमान इस्लामला शुन्यावर आऊट केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा ईशांतने बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला देखील माघारी पाठवलं. बांगलादेशला एका मागे एक झटके लागले. १३ रनवर बांगलादेशने ४ विकेट गमवले.


टीम इंडियाकडून पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहलीने १३६ रन केले. कोहलीने १९४ बॉलमध्ये १८ फोरच्या मदतीने १३६ रनची शानदार खेळी केली. कोहलीचं हे २७ वं शतक होतं. चेतेश्वर पुजाराने ५५ आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं ५१ रनचं योगदान दिलं.