Team India Won: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने हे लक्ष्य सहज गाठलं. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. शिखर धवन आणि शुभमन गिल या दोघांनीही या सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावली. शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा डाव 189 धावांवर आटोपला. डावातील शेवटची विकेट अक्षर पटेलच्या नावावर होती. झिम्बाब्वेकडून रेगिस चकाबवाने 35, रिचर्ड नागरवाने 34 आणि ब्रॅड इव्हान्सने 33 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि दीपक चहर यांनी 3-3 बळी घेतले.



झिम्बाब्वे संघ: तदीवानाशे मारुमनी, इनोसेंट कॅया, सीन विलियम्स, वेस्ले मधेवेरे, सिकंदर रझा, रेजिस चकबवा (कर्णधार), रयान बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इवांस, विक्टर न्याउची, रिचर्ड नगारवा


भारतीय संघ: शिखर धवन, शुभमन गिल, ईशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज