नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या २०३ रन्सचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० ओव्हर्समध्ये १४९/८ एवढा स्कोअर करता आला. युझुवेंद्र चहाल आणि अक्सर पटेलनं न्यूझीलंडच्या दोन विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली. शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या आशिष नेहराला एकही विकेट मिळाली नाही. नेहरानं ४ ओव्हरमध्ये २९ रन्स दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होत असलेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवननं १५८ रन्सची पार्टनरशीप केली. शिखर धवननं ५२ बॉल्समध्ये ८० तर रोहित शर्मानं ५५ बॉल्समध्ये ८० रन्स केल्या. तर विराट कोहलीनं ११ बॉल्समध्ये नाबाद २६ आणि धोनीनं २ बॉल्समध्ये नाबाद ७ रन्स बनवले. वनडे सीरिज २-१नं जिंकल्यानंतर आता ३ मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे.