मुंबई : टीम इंडियासाठी (Indian Cricket Team) अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे एशिया कपला (Asia Cup 2022) मुकावं लागलं आहे. त्यातच आता बुमराहचं आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (Icc T20i World Cup) खेळणार की नाही, याबाबत अस्पष्टता आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुमराहला 3 वर्षांपूर्वी दुखापत झाली होती.या दुखापतीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. (team india yorker king jasprit bumrah injurey update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"टी 20 वर्ल्ड कपसाठी फक्त 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. अशाचत बुमराहला चुकीच्या वेळेस ही दुखापत झाली आहे. बुमराहची दुखापत ही आमच्यासाठी चिंताजनक बाब आहे. बुमराहच्या दुखापतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत", अशी माहिती इनसाईड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.


"बुमराह सध्या बंगळुरुतील एनसीएमध्ये (National Cricket Acedmy) आपल्या दुखापतीवर मेहनत घेतोय. तिथे त्याला योग्य उपचार मिळतील. बुमराह आमच्यासाठी बेस्ट बॉलर आहे. बुमराहला फार सावध राहण्याची गरज आहे",असंही या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नमूद केलं. बुमराहला जर दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं, तर टीम इंडियासाठी हा मोठा झटका असेल.