Team India | बुमराह-मलिगांसारखा टीम इंडियाचा घातक गोलंदाज सिलेक्टर्समुळे OUT
टीम इंडियाच्या (Team India) या स्टार गोलंदाजाने संघात जोरदार एन्ट्री मारत आपली छाप सोडली होती.
मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) या स्टार गोलंदाजाने संघात जोरदार एन्ट्री मारत आपली छाप सोडली होती. मात्र लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि जसप्रीत बुमराहसारखा (Jasprit Bumrah) हा घातक गोलंदाज निवड समितीच्या दुर्लक्षामुळे आज टीमबाहेर आहे. दुधातली माशी बाहेर काढावी, त्याप्रकारे निवड समितीने या यॉर्कर स्पेशालिस्ट बॉलरला बाहेर फेकलं आहे. या गोलंदाजाला संधी न दिल्याने टॅलेन्ट वाया जात असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. (team india yorker king thangarasu natrajan out in team after 28 march 2021)
मलिंगा आणि बुमराहसारखा घातक गोलंदाज
टीम इंडियाचा हा गोलंदाज 'यॉर्कर किंग' म्हणून ओळखला जातो. वेगवान आणि अचूक यॉर्कर टाकणारा टी नटराजन (T Natrajan) गेल्या वर्षभरापासून टीम इंडियाबाहेर आहे.
नटराजन अखेरच्या वेळेस वनडे आणि टी 20 मालिकेत इंग्लंड विरुद्ध 2021 मध्ये खेळताना दिसला होता. त्यामुळे निवड समिती नटराजनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का, असा सवाल या निमित्ताने क्रिकेट चाहते उपस्थित करत आहेत.
नटराजनची क्रिकेट कारकिर्द
नटराजनच्या क्रिकेट कारकिर्द ही फार मोठी नाही. मात्र त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात एन्ट्री मारली होती. नटराजनने आतापर्यंत 4 टी 20, 2 वनडे आणि 1 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
आयपीएलच्या 13 व्या मोसमात त्याने केलेल्या दमदार कामगिरीमुळेच त्याला टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
जोरात आला आणि जोरातच बाहेर गेला
प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न होतं. मात्र प्रत्येक खेळाडूचं ते स्वप्न पूर्ण होतंच, असं नाही. नटराजन विरुद्ध जे काही घडलं हे त्याच्यासाठी स्वप्नवत ठरलं.
नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. मात्र टीममधील खेळाडूंना दुखापत झाली. ही दुखापत नटराजनच्या पथ्यावर पडली. इतर खेळाडूंच्या दुखापतीमुळेच नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली.
नटराजनची फार जोरात टीम इंडियात एन्ट्री झाली. मात्र त्याने ज्या जोरात एन्ट्री घेतली तितक्या जोरातच तो निवड समितीच्या दुर्लक्षामुळे बाहेर गेला आहे. त्यामुळे आता नटराजनला टीम इंडियात केव्हा संधी मिळणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.