मुंबई : T-20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारतीय संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. काही लोकांनी मर्यादा ओलांडली आणि शमीविरोधात चुकीच्या कमेंट्स केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यानंतर आता शमीचं एक जुनं वक्तव्य व्हायरल होताना दिसतंय. ज्यामध्ये तो देशाची फसवणूक करण्याऐवजी देशासाठी मरणं पसंत करेन असें म्हटलं होतं. 2018 मध्ये मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्याची पत्नी हसीन जहाँने या गोलंदाजावर घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप केले होते.


यानंतर शमीने पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, "सर्वात मोठा प्रश्न माझ्यावर निर्माण झाला आहे. आज नाही, आजही देशासाठी फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर मी पसंत करेन. मी भारतीय सैन्याचा आदर करतो. मी खोटारडं असल्याचे सिद्ध झाले तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


शमी पुढे म्हणाला होता की, "आमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. हे आमच्या विरोधात मोठं षड्यंत्र आहे. माझी बदनामी करण्याचा किंवा माझे करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय."


पाकिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करू इच्छित आहे. दोन्ही संघांमधील हा बहुप्रतिक्षित सामना 31 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.