David Warner Emotional Video : ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांच्या (AUS vs PAK) कसोटी मालिका 3-0 ने खिशात घातली आहे. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत कांगारू संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. हा सामना ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner Retirement) आता कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार नाही. अशातच आता सामना जिंकल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक झाल्याचं पहायला मिळालं. वॉर्नरच्या डोळ्यात पाणी (David Warner crying) पाहून अनेकांना त्याची कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला David Warner ?


कँडिस माझ्या आयुष्यात आली आणि एक प्रकारे तिनं मला योग्य मार्गावर आणलं. आमचे एक सुंदर कुटुंब आहे आणि मी त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. मी मरेपर्यंत त्यांच्यावर प्रेम करेन आणि सध्या मी खूप काही बोलू शकणार नाही, कारण मी सध्या भावूक होतोय. पण कँडिस, तू जे केलेस त्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी तू माझे जग आहेस, असं म्हणत डेव्हिड वॉर्नरने पत्नीने (David Warner Thanks to wife) आभार माने आहेत.


मला माझं कुटूंब महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्याचा हा मोठा भाग आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकलो नसतो. मी माझ्या यशाचं श्रेय माझ्या पालकांना देतो. त्यांनी मला जसं सांभाळलं. माझा भाऊ स्टिवमुळे मी क्रिकेट खेळू शकलो. त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन मी इथंपर्यंत आलोय, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.



दरम्यान, वॉर्नरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) डोळ्यात अश्रू दिसून आले. डेव्हिड वॉर्नरही मैदानावर पत्नीला मिठी मारताना दिसला. सिडनी क्रिकेट मैदानावर पत्नीला मिठी मारल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक झाला होता. यावेळी त्याने त्याच्या तीन मुलींना मिठी मारली. त्यावेळी वॉर्नरला पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.