मुंबई : सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे ती चार आठवड्यांपासून टेनिसकोर्टपासून दूर आहे. आता सानिया गुडघ्यावर शस्त्रक्रीया करावी की, नाही याबाबत विचार करतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानियाच्या उजव्या गुडघ्याच्या दुखापतीनं आता पुन्हा डोक वर काढलंय. दुखापतीमुळे जवळपास एक महिन्यापासून ती टेनिसकोर्टवर उतरलेलीच नाही. २०१७ च्या टेनिस सीझनची सुरुवात तिनं नंबर वन टेनिसपटू म्हणून केली. मात्र, आता डब्ल्यूटीए टेनिस रँकिंगमध्ये  सानिया नवव्या क्रमांकावर फेकली गेलीय. 


महिला दुहेरीत कायमच सानियाची जादू पाहिला मिळते. मात्र, काही कारणामुळे सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस ही जोडी विभक्त झाली. यानंतर सानियाला महिला दुहेरीत फारस यश मिळालं नाही. 


हिंगिसबरोबर जोडी तुटल्यानंतर सानिया बार्बरा स्ट्रीकोव्हा, यारोस्लाव्ह श्वेडोव्हा आणि पेंग शुई या टेनिसपटूंबरोबर टेनिसकोर्टवर उतरली मात्र तिच्या पदरी निराशाच पडली. 


चायना ओपनमध्ये सानिया शेवटची खेळतांना तिच्या चाहत्यांना दिसली. त्यानंतर ती विश्रांतीच घेतेय. आणखी दोन आठवडे सानिया विश्रांती घेणार आहे. आणि त्यानंतर उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी की, नाही याबाबत विचार करतेय. 


महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी मिळून सहा ग्रँडस्लॅम जिंकणारी सानिया दुखापतींवर मात करत पुन्हा टेनिस कोर्टवर कधी कमबॅक करेल याची वाट आता तिचे चाहते पाहातायत.